शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पाठ्यवृत्ती; २३ व्या वर्षी १० लाख, पंतप्रधानांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 06:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ही घोषणा केली.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात पालक गमावलेल्या मुलांना ‘प्राइम मिनिस्टर केअर फॉर चिल्ड्रन’ या योजनेतून १८ ते २३ वर्षे वयापर्यंत दर महिना चार हजार रुपये पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. अशा मुलांना वयाच्या २३व्या वर्षी १० लाख रुपये देण्यात येतील. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार कर्जही उपलब्ध करून देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ही घोषणा केली. कोरोना साथीत पालक गमावलेल्या मुलांना वैद्यकीय उपचारांसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यांना केंद्र सरकार आयुष्यमान कार्ड देणार आहे. त्यातून ५ लाख रुपयांपर्यंत उपचारांसाठी खर्च करता येतील. कोरोना  साथीचे सामाजिक, आर्थिक असे दुहेरी विपरित परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेले दिसून येत आहेत. या संसर्गाने झालेल्या मृत्यूंमुळे अनेक घरांमध्ये कमावती माणसे हरपली आहेत. पालक गमावल्यामुळे मुले अनाथ झाली. लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

काय आहेत ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’ची वैशिष्ट्ये ?

अनाथ मुलांना घराजवळच्या सरकारी शाळांत प्रवेश दिला जाईल. ते खासगी शाळेत शिकत असतील तर तिथे भरलेली फी शिक्षणाचा हक्क योजनेतील तरतुदीद्वारे त्यांना परत करण्यात येईल. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहर नवोदय निवासी विद्यालयांमध्ये या मुलांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. पहिली ते बारावी इयत्तेपर्यंत या मुलांना दरवर्षी २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.

समुपदेशनासाठी विशेष हेल्पलाईन

या मुलांच्या पाठीशी प्रत्येक भारतीय नागरिक आहे, ही भावना प्राइम मिनिस्टर केअर फॉर चिल्ड्रन योजनेमुळे प्रबळ होईल. अनाथ झालेल्या मुलांच्या समुपदेशनासाठी केंद्र सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकार