‘अग्नी-४’ ची चाचणी यशस्वी
By Admin | Updated: December 3, 2014 01:37 IST2014-12-03T01:37:46+5:302014-12-03T01:37:46+5:30
भारताच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशा किनारपट्टीवर घेण्यात आली.

‘अग्नी-४’ ची चाचणी यशस्वी
बालेश्वर : भारताच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशा किनारपट्टीवर घेण्यात आली. मारक क्षमता ४ हजार कि.मी. असलेल्या अग्नी-४ ची ही चौथी यशस्वी चाचणी आहे. याआधी याच वर्षी २० जानेवारी रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.
येथील व्हिलर या बेटावर असलेल्या एकात्मिक चाचणी केंद्राच्या परिसर-४ मधून मंगळवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी या क्षेपणास्त्राचा मोबाईल लाँचरमधून मारा करण्यात आला. भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करू शकणारे हे उच्च दर्जाचे खात्रीशीर असे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात मार्गात होणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी नवीन यंत्रणा बसविली गेली आहे. (वृत्तसंस्था)