शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 23:29 IST

अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. शोपियानमध्ये मजुरी करणाऱ्या बिहारच्या तीन तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर अमरनाथ यात्रेची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. 

बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पमध्ये चौकाचौकात नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोपियानमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता हा हल्ला झाला आहे. मुखवटा घातलेले दहशतवादी एसओजी कॅम्पजवळ राहणाऱ्या इर्शाद हुसैन यांच्या घरामध्ये घुसले. तेथे भाड्याने राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांची त्यांनी चौकशी केली. यानंतर तिघांच्या खोलीत घुसून गोळ्या झाडल्या.

अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली. तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती पाहता त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर