शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:41 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

Smriti Irani on Congress : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 च्या मुद्द्यावरुन झालेला गोंधळ आणि  फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "जम्मू-काश्मीर विधानसभेत संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स देश तोडण्याचे काम करत आहेत," अशी घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी केली. तसेच, यासिन मलिकच्या पत्नीच्या पत्रावरुन त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.

स्मृती इराणी म्हणतात, "दहशतवादी मार्गावर चालणारे गांधी कुटुंबाची मदत घेत आहेत. ज्याने काश्मीरमध्ये दहशत निर्माण करुन निष्पाप लोकांचे प्राण घेतले, तो आज गांधी कुटुंबासमोर मदतीचा हात पुढे करत आहे. आज या खोलीत बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी पाठिंबा मागू शकतो का? मग असे काय झाले की, दहशतवादाचे समर्थन करणारे गांधी घराण्याची मदत मागत आहेत?"

संविधानाचा गळा घोटला गेला "भारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य आहे. त्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिला? इंडिया आघाडीने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून आदिवासी, दलित आणि महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडिया आघाडीचे लोक भारतीय राज्यघटनेच्या विरोधात नवे युद्ध पुकारताना दिसत आहेत," अशी टीकाही इराणी यांनी केली.

त्या पुढे म्हणतात, "संसदेच्या अधिकारांना आव्हान देण्याचा अधिकार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला कोणी दिला? कलम 370 रद्द केल्यानंतर दलित आणि आदिवासींना दिलेले अधिकार काँग्रेसला का रद्द करायचे आहेत? कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये 70 टक्के घट झाली आहे. नवीन सरकारने जनतेच्या विकासासाठी काम केले पाहिजे पण त्याऐवजी ते भलत्याच कामात गुंतले आहेत. राज्यातील नवे सरकार भारताला एकत्र करण्याऐवजी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 परत आणण्याचे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत."

यासीनच्या पत्नीचे राहुल गांधींना पत्रजम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या फुटीरतावादी संघटनेचा नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिकने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यासिन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मुशालने या पत्रात म्हटले आहे. मुशालने राहुल गांधींना हे प्रकरण संसदेत मांडण्याचे आवाहन केले आहे. यासीन मलिक देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असून, 2022 मध्येच न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..." 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर