पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला दहशतवादी धमकी मिळाली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी दिली. फोन करुन पोलिसांना ही माहिती दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा एक मेल करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून अटक केली. तो व्यक्ती मानसिकृष्ट्या आजारी आहे.
पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता,यामध्ये पंतप्रधान मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना त्याबद्दल माहिती दिली आणि तपास सुरू केला.
याआधीही असे धमकीचे मेल आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर एक धमकी पाठवण्यात आली होती, यामध्ये दोन कथित आयएसआय एजंट्सचा समावेश असलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटाचा दावा करण्यात आला होता. याशिवाय, गेल्या वर्षी, कांदिवलीतील ३४ वर्षीय रहिवासी शीतल चव्हाण याला पंतप्रधान यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
फ्रान्स- अमेरिका दौऱ्यावर पीएम नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी पॅरिसला गेले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी जगभराती टेक कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी एआय अॅक्शन समिटमध्ये सहभाग घेतला. बुधवारी पीएम मोदी अमेरिकेत पोहोचले, त्यांचा अमेरिका दौरा १२ आणि १४ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा असणार आहे.