शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उच्छाद, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं केलं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:36 IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे.

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याचे पोलीस खात्यांमधील सूत्रांचे म्हणणे आहे.  बुधवारी त्राल परिसरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची मुक्तता व्हावी यासाठी पोलीस खाते प्रयत्नशील आहे. 

कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी खारपोरा येथील पोलीस कर्मचारी बशीर अहमद यांचा मुलगा फैजान आणि येरिपोरा येथील पोलीस कर्मचारी अब्दुल सालेम यांचा मुलगा सुमेर अहमद, काटापोरा येथील डीएसपी इजाज अहमद यांचा भाऊ गौहर अहमद याचेही अपहरण झाल्याचे वृत्त आहे. तर मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातसुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला दहशतवाद्यांनी मारहाण केली. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना अटक  केल्याचा तसेच त्यांच्या घरांना आग लावल्याचा आरोप करून काश्मीर खोऱ्यात निषेध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्याची गेल्या 28 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर