'या' अतिरेक्यांना घरात घुसून मारा - अक्षय कुमार
By Admin | Updated: January 5, 2016 14:38 IST2016-01-05T14:38:19+5:302016-01-05T14:38:19+5:30
दहशतवादाच्या समस्येवर माझ्याकडे अंतिम तोडगा नाही पण ज्या प्रमाणे या अतिरेक्यांनी आपल्या देशात घुसून आपल्या जवानांना मारले तशीच कारवाई या अतिरेक्यांवर करा.

'या' अतिरेक्यांना घरात घुसून मारा - अक्षय कुमार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची भावना असताना अभिनेता अक्षयकुमारनेही आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
दहशतवादाच्या समस्येवर माझ्याकडे अंतिम तोडगा नाही पण ज्या प्रमाणे या अतिरेक्यांनी आपल्या देशात घुसून आपल्या जवानांना मारले तशीच कारवाई या अतिरेक्यांवर करा, यांना यांच्या घरात घुसून मारा असे अक्षयने म्हटले आहे.
अतिरेक्यांबद्दल अक्षयने संताप व्यक्त केला असला तरी, त्याने या हल्ल्याला पाकिस्तानशी जोडू नये असे म्हटले आहे. अतिरेक्यांना शांतता चर्चेमध्ये मोडता घालायचा असल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांना अक्षयने पाठिंबा दिला.