जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

By Admin | Updated: January 10, 2017 12:23 IST2017-01-10T11:40:49+5:302017-01-10T12:23:33+5:30

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांच्या चकमकीमध्ये 1 दहशतवादी ठार झाला आहे.

The terrorists' encounter in Jammu and Kashmir ended | जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

ऑनलाइन लोकमत

जम्मू कश्मीर, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांच्या चकमकीमध्ये 1 दहशतवादी ठार झाला आहे. बांदीपोरा मधिल पराय मोहल्ला हाजीनमध्ये दहशतवादी लपले असल्याचे माहिती मिळताच सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन केले. त्यावेळी दहशतवादी आणि जवानांध्ये चकमक झाली, यामध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमकीत खात्मा झालेल्या दहशतवाद्याहद्दल आद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. यावेळी एक भारतीय जवान गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे,  मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.  
 
सोमवारी पहाटे जम्मू जवळ अखनूरमधील जनरल रिझर्व्ह इंजिनीअरिंग फोर्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत हल्ला केला होता. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. 
 

Web Title: The terrorists' encounter in Jammu and Kashmir ended