अतिरेक्यांनी केली एस. टी. बस ‘हायजॅक’ एस. टी. स्टॅण्डमधील थरार : एटीएसच्या पथकाने केली प्रवाशांची सुटका
By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30
सोलापूर : दुपारची वेळ एस.टी. स्टॅण्ड परिसरातील बार्शी स्थानकावर थांबलेल्या बसमध्ये दोन अतिरेकी घुसले. रायफलचा धाक दाखवून पूर्ण ताबा मिळवला. काय होतंय हे कळायच्या आत फायरिंग केल्याने आपली बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बघता बघता ही बातमी वार्यासारखी एस. टी. स्टॅण्ड परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. ही बातमी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला समजली, एस. टी. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीवरून चार, प्रवेशद्वारातून चार, पाठीमागील प्रवेशद्वारातून चार अशा गटागटाने एटीएसच्या जवानांनी बसला वेढले आणि मोठय़ा शिताफीने अतिरेक्यांना ताब्यात घेऊन प्रवाशांची सुखरूप सुटका केली. हा सर्व प्रकार मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) असल्याचे समजताच एस. टी. स्टॅण्ड परिसरातील नागरिकांचा जीव मात्र भांड्यात पडला.

अतिरेक्यांनी केली एस. टी. बस ‘हायजॅक’ एस. टी. स्टॅण्डमधील थरार : एटीएसच्या पथकाने केली प्रवाशांची सुटका
स लापूर : दुपारची वेळ एस.टी. स्टॅण्ड परिसरातील बार्शी स्थानकावर थांबलेल्या बसमध्ये दोन अतिरेकी घुसले. रायफलचा धाक दाखवून पूर्ण ताबा मिळवला. काय होतंय हे कळायच्या आत फायरिंग केल्याने आपली बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बघता बघता ही बातमी वार्यासारखी एस. टी. स्टॅण्ड परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. ही बातमी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला समजली, एस. टी. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीवरून चार, प्रवेशद्वारातून चार, पाठीमागील प्रवेशद्वारातून चार अशा गटागटाने एटीएसच्या जवानांनी बसला वेढले आणि मोठय़ा शिताफीने अतिरेक्यांना ताब्यात घेऊन प्रवाशांची सुखरूप सुटका केली. हा सर्व प्रकार मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) असल्याचे समजताच एस. टी. स्टॅण्ड परिसरातील नागरिकांचा जीव मात्र भांड्यात पडला. देशातील अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एस. टी. स्टॅण्ड परिसरात मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) घेण्यात आले. या कारवाईत दहशतवादीविरोधी पथक, जलद प्रतिसाद पथक (क्यु.आर.टी.), दंगानियंत्रण पथक (आर.सी.पी) च्या 46 जवानांनी सहभाग घेतला होता. एटीएसमधील दोन पोलीस कर्मचारी रायफल घेऊन एस. टी. बसमध्ये घुसतात. एस. टी. चालक व वाहकासह सर्व प्रवाशांना रायफलीच्या धाकाने ताब्यात घेतले. प्रवाशांनी आरडाओरड केली मात्र रायफलमधून फायरिंग केल्याने सर्वांचा आवाज बंद झाला. फायरिंगमुळे आतमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे हे स्थानकावरील अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. सर्वत्र पळापळ सुरू झाली आणि याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. अवघ्या काही मिनिटात एटीएस, क्युआरटी, आर.सी.पी.चे जवान संपूर्ण तयारीनिशी दाखल झाले. अतिरेक्यांना कसलीही संधी न देता बसला वेढतात आणि अतिरेक्यांवर रायफल रोखली. अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडत ‘एटीएस’ पथकातील जवान बसमध्ये घुसले. अतिरेक्यांची रायफल काढून घेऊन त्यांना बाहेर काढले. सर्व प्रवाशांना बाहेर काढून जमिनीवर बसवले, सर्वांची तपासणी करून प्रवाशीच आहेत का, हे पाहिले. यातील दोनच अतिरेकी असल्याचे लक्षात आल्याने त्यांना हाथ वर करून जमिनीवर बसवण्यात आले. त्यांच्या खिशातील मोबाईल, पाकीट आदी साहित्य काढून घेतले. बाहेरून हल्ला झाला तर त्याला रोखण्यासाठी दोन अतिरेक्यांनी एस.टी.च्या टफावर बसून रायफल रोखली. अतिरेक्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून घेऊन गेले. अशा पद्धतीने प्रवाशांची अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रात्यक्षिकप्रसंगी र. पोलीस निरीक्षक अंकुश यादव, फौजदार एस. डी. चवरे, वाहतूक शाखेचे फौजदार रवींद्र भंडारे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) कोट..अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर एस. टी. स्टॅण्ड परिसरात असा प्रकार घडला तर कशा पद्धतीने सामना करावा लागेल आणि प्रवाशांचे संरक्षण होईल याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. देशभरात कोठेही असा प्रसंग होऊ शकतो, त्यासाठी सतर्कता म्हणून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. अंकुश यादव, र. पोलीस निरीक्षक