शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी सागरी मार्गानं भारतात घुसण्याच्या तयारीत; नौदल प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:22 IST

पुलवामा हल्ल्यावरून नौदल प्रमुखांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्ष इशारा

नवी दिल्ली: नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. भारताला अस्थिर करण्याच्या मानस असलेल्या एका देशाकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर कट्टरतावाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला, असं लांबा म्हणाले. दहशतवादी सागरी मार्गानं देशात घुसण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. भारतात हल्ले घडवण्यासाठी दहशतवादी सागरी किंवा अन्य मार्गांचा वापर करू शकतात, असं सुनील लांबा म्हणाले. त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहितीदेखील आमच्याकडे उपलब्ध आहे, असं लांबा यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदनं सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. याआधी दहशतवाद्यांनी 26/11च्या हल्ल्यावेळी सागरी मार्गाचा वापर केला होता. हिंदी-पॅसिफिक विभाग संवाद कार्यक्रमात सुनील लांबा बोलत होते. यावेळी संरक्षण क्षेत्राशी संबंधित विशेष तज्ज्ञ आणि राजदूत उपस्थित होते. 'आता नव्या प्रकारचा दहशतवाद दिसू लागला आहे. जगातील मोजकेच देश या प्रकारच्या दहशतवादापासून स्वत:चा बचाव करू शकले आहेत. दहशतवाद हे जगापुढील आव्हान आहे. जगासमोरील ही समस्या वाढतच आहे. दहशतवादाचं नवं स्वरुप आणि त्याची व्यापकता चिंताजनक आहे,' असं लांबा म्हणाले. भारत दहशतवादाचा पीडित असून ही समस्या अतिशय गंभीर असल्याचं नौदल प्रमुखांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली. 'जवळपास तीन आठवड्यांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. भारताला अस्थिर करण्याची मानस बाळगणाऱ्या देशाच्या मदतीनं दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला,' असं लांबा यांनी म्हटलं. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी