जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटली

By Admin | Updated: May 2, 2017 15:10 IST2017-05-02T15:01:54+5:302017-05-02T15:10:28+5:30

कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.

The terrorists again looted the bank in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटली

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटली

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 02 - कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बॅंक लुटल्याची घटना मंगळवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. 
दरम्यान, कालच कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत  50 लाखांच्या रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये  5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता. 
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यामध्ये दोन जवान काल शहीद झाले. या दरम्यानच पाककडून शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. 
 

Web Title: The terrorists again looted the bank in Jammu and Kashmir