दहशतवादी तारा याला ११ दिवसांची कोठडी
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:40+5:302015-02-15T22:36:40+5:30
बठिंडा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचा मारेकरी खलिस्तान टायगर फोर्सचा अतिरेकी जगतारसिंग तारा याला ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याचा साथीदार अमरजितसिंग याला दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश उपदंडाकारी गुरप्रीतसिंग यांनी दिला.

दहशतवादी तारा याला ११ दिवसांची कोठडी
ब िंडा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचा मारेकरी खलिस्तान टायगर फोर्सचा अतिरेकी जगतारसिंग तारा याला ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याचा साथीदार अमरजितसिंग याला दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश उपदंडाकारी गुरप्रीतसिंग यांनी दिला.तारा याला यापूर्वी सहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. पोलीस कोठडी आणखी वाढविण्याला त्याच्या वकिलांनी विरोध केला होता. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्याला नाभा कारागृहात पाठविण्यात आले आहे.