शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वे प्रेशर कुकर बॉम्बने उडवण्याची धमकी; स्लीपर सेल्सला आदेश देणारा फरहातुल्ला घोरी कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:43 IST

दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा भारतातील स्लीपर सेलला देशभरातील रेल्वे गाड्यांवर हल्ले करण्यास सांगत असलेला व्हिडिओ समोर आला आहे.

Terrorist Farhatullah Ghori : भारतातील गुप्तचर यंत्रणा सध्या हाय अलर्ट मोडमध्ये आहेत. कारण भारतीय गाड्या प्रेशर कुकर बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पाकिस्तानात गेल्या २२ वर्षांपासून लपून बसलेल्या दहशतवाद्याने अचानक समोर येत एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली ाहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आणखी एक कट समोर आला आहे. या कटामध्ये देशातील अनेक हिंदुत्ववादी नेते दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचीही माहिती मिळाली आहे. यासाठी काही स्पीपर सेल्स कार्यरत झाल्याची माहितीही पुढे आली आहे.

दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा भारतातील स्लीपर सेलला देशभरातील रेल्वे गाड्यांवर हल्ले करण्यास सांगत असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. फरार फरहातुल्ला जिहादी घोरी याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या सहकार्याने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्लीपर सेलद्वारे स्फोटाची योजना आखली होती. त्यानंतर आता घोरीने व्हिडीओद्वारे दिलेल्या धमकीमुळे चिंता वाढली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने स्लीपर सेलच्या मदतीने भारतातील रेल्वेचे जाळे रुळावरून उतरवण्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडिओमध्ये फरहातुल्ला घोरी स्लिपर सेल्सना प्रेशर कुकर वापरून बॉम्बचा स्फोट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरहातुल्ला घोरी हा भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

व्हिडिओमध्ये फरहातुल्ला पेट्रोल आणि गॅस पाइपलाइन उडवण्याबाबतही बोलत आहे. भारत सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्था (एनआयए) मार्फत आमच्या मालमत्तांना लक्ष्य करून स्लीपर सेल्सना कमकुवत करत आहे. पण आम्ही परत येऊ आणि सरकारला हादरवून टाकू,” असे घोरीने म्हटलं आहे. दुसरीकडे, हा व्हिडिओ तीन आठवड्यांपूर्वी टेलिग्रामवर प्रसिद्ध झाल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, १ मार्च रोजी रामेश्वरममध्ये झालेल्या स्फोटात किमान १० जण जखमी झाले होते. एनआयएने दोन मुख्य आरोपी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब यांना अटक केली होती. ताहा हा या स्फोटाचा मास्टरमाईंड होता तर शाजिबने कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला होता. दोघांना कोलकाताजवळील एका लॉजमधून अटक करण्यात आली. फरहातुल्ला घोरी आणि त्याचा जावई शाहिद फैसल यांचे दक्षिण भारतात स्लीपर सेलचे मजबूत जाळे आहे. फैसल रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता आणि या प्रकरणाचा तो हँडलर होता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPakistanपाकिस्तानBengaluruबेंगळूरBlastस्फोटterroristदहशतवादी