शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदला झटका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा, दाऊद कुटुंबीयांची याचिका SCने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 14:20 IST

भारतातला मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित कोट्यवधींची मालमत्ता सरकारनं जप्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात दाऊदची आई अमिना बाई कासकर आणि दाऊदची बहीण हसिना पारकर यांची याचिका फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली- भारतातला मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित कोट्यवधींची मालमत्ता सरकारनं जप्त करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात दाऊदची आई अमिनाबाई कासकर आणि दाऊदची बहीण हसिना पारकर यांची याचिका फेटाळून लावली. दाऊदची ही मालमत्ता मुंबईतल्या नागपाडा भागात असून, दाऊदची बहीण आणि आईनं या मालमत्तेवर दावा केला होता. परंतु सद्यस्थितीत दाऊदची आई आणि बहीण हयात नाही. 

1988मध्ये सरकारनं दाऊदची ही मालमत्ता जप्त केली होती. पण त्यानंतर अमिना कासकर आणि हसिना पारकर यांनी न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केली होती. न्यायदंडाधिकारी आणि दिल्ली उच्च न्यायालयानं या दोघींची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. दाऊद इब्राहिम 1993मधल्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात 257 मुंबईकरांना स्वतःच्या प्राणांना मुकावं लागलं होतं. तसेच अनेक जण जखमीही झाले होते. या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम देश सोडून पळाला. 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करताना अमिना कासकर आणि हसिना पारकर यांना मालमत्तेचे दस्तावेज दाखवण्यास सांगितले होते. परंतु दोघींनाही मालमत्तेचे दस्तावेज न्यायालयात सादर करता आलेले नाहीत.दाऊदच्या आई- बहिणीच्या नावावर मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत 7  मालमत्ता आहेत. ज्यातील दोन अमिना यांच्या नावावर होत्या, तर 5 मालमत्ता हसिना पारकर यांच्या नावे होत्या. दाऊदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंही जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. दक्षिण मुंबईतलं दाऊदचं एक हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा सरकारनं पहिलाच लिलाव केला आहे. भारताच्या आग्रहाखातर इतर देशांनीही दाऊदची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. दाऊद सध्या पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या नजरकैदेत आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई