Surgical strike मध्ये उद्धवस्त झालेले दहशतवादी तळ पुन्हा अॅक्टिव्ह
By Admin | Updated: April 12, 2017 17:34 IST2017-04-12T17:30:59+5:302017-04-12T17:34:25+5:30
भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्धवस्त केलेल्या दहशतवादी तळांवर पुन्हा कारवाया सुरु झाल्या आहेत.

Surgical strike मध्ये उद्धवस्त झालेले दहशतवादी तळ पुन्हा अॅक्टिव्ह
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्धवस्त केलेल्या दहशतवादी तळांवर पुन्हा कारवाया सुरु झाल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील उद्धवस्त केलेल्या दहशतवादी तळांवर पुन्हा हालचाली सुरु आहेत अशी माहिती मेजर जनरल आरपी कालिता यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ते बारामुल्ला स्थित लष्कराच्या 19 डिव्हीजनचे प्रमुख आहेत.
बर्फ वितळत असून, याच काळात दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून मदत मिळते. मागच्यावर्षी सप्टेंबरमहिन्यात उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्कराच्या स्पेशल फोर्सेसनी पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. उरी हल्ल्यात भारताचे 19 जवान शहीद झाले होते. दशकातील उरी येथे झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला होता.
सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी मागे फिरल्याची माहिती होती. पण हिवाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा दहशतवादी लाँच पॅडवर जमा झाले असे मेजर जनरल कालिता यांनी सांगितले. कालिता यांच्या डिव्हीजनवर नियंत्रण रेषेजवळच्या 100 किमीच्या क्षेत्रफळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांच्या भागात नऊ ते दहा लाँच पॅडस आहेत. लाँच पॅड हा घुसखोरीपूर्वीचा दहशतवाद्यांचा शेवटचा टप्पा असतो.