शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय; लष्करप्रमुख म्हणाले आता एअरस्ट्राइक नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:42 IST

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का?

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी गट सक्रीय झाल्याची माहिती आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की, भारताने एअरस्ट्राइक करत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र मागील 8 महिन्यांपासून त्या जागेवर पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्याचं दिसून येत आहे. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पला भारतीय हवाई दलाने नष्ट केले होते. 

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही एअर स्ट्राइक पुन्हा का करणार? यापुढेही जाऊ शकत नाही का? असं सांगत एकप्रकारे लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतीय लष्कर सीमेवर पूर्णपणे सज्ज आहे. नियंत्रण रेषेवर जवान तैनात आहेत असं त्यांनी म्हटलं. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिमी सीमेवर तणाव कायम आहे. आमच्या शेजारील राष्ट्रासोबत संबंध ताणले गेले आहेत असं सांगून पाकिस्तान आणि चीन यांच्यावर लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी निशाणा साधला आहे. युद्धात कोणीही उपविजेता नसतो. फक्त जिंकणे महत्वाचे असते. भविष्यात सायबर युद्ध होईल. त्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे असंही रावत यांनी सांगितले. 

बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षण तळ आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावर जवाबी कारवाई म्हणून भारताने बालाकोटचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यानंतर अंगाचा तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या आशीर्वादाने जैश-ए-मोहम्मदने आपले हे तळ पुन्हा सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी होणाऱ्या आमसभेत काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा आकांडतांडव करण्याचाही पाकिस्तानचा मनसुबा आहे.

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान