श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
By Admin | Updated: October 14, 2016 21:12 IST2016-10-14T20:03:56+5:302016-10-14T21:12:30+5:30
जम्मू-काश्मीरमधील झकुरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पजवळ शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 14 - जम्मू-काश्मीरमधील झकुरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पजवळ शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झकुरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पजवळ सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी हा गोळीबार सीमा सुरक्षा दलाचे जवान ड्युटीवरुन कॅम्पकडे परत येताना केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. तर आठ जवान जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अद्याप सीआरपीएफच्या कॅम्पजवळ गोळीबार सुरु असून लष्कराचे जवान दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत.
Of the 8 SSB jawans injured, 3-4 are critically injured. Search operation is now underway: IG SSB, Deepak Kumar pic.twitter.com/gMzgENuqaO
— ANI (@ANI_news) October 14, 2016