श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस ठार
By Admin | Updated: April 2, 2017 21:23 IST2017-04-02T21:23:46+5:302017-04-02T21:23:46+5:30
जमू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस ठार तर 11जवान जखमी झाले आहेत. त्यांच्या या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस ठार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - जमू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस ठार तर 11जवान जखमी झाले आहेत. त्यांच्या या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयाच नेण्यात आले आहे. काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून श्रीनगर बंद ठेवावे असे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले होते.
आज सायंकाळी सातच्या सुमारास नौहट्टा येथील गंजबक्ष पार्कमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू - काश्मीर दौऱ्यावर आहेत म्हणून सकाळपासून तैनात असलेले अधिकारी सायंकाळच्या वेळी थोडा वेळ आराम करत होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.