पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला
By Admin | Updated: September 18, 2016 23:57 IST2016-09-18T23:50:20+5:302016-09-18T23:57:43+5:30
पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांच्या घरावर आता काही संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 18 - गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. जम्मू-काश्मीर हे दहशतवाद्यांच्या नेहमीच केंद्रस्थानी असते. पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांच्या घरावर आता काही संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
या हल्लेखोरांनी जावेद अहमद शेख यांच्या सुरक्षारक्षकांकडून 4 एके के 47 रायफल खेचून घेऊन त्यांच्या घरावर हल्ला चढवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील डालगाम गावात पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांचं घर आहे. या घराबाहेर पहारा देत असलेल्या सुरक्षारक्षकांकडून संशयित दहशतवाद्यांनी 4 एके 47 रायफल्स काढून घेतल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एफआयआर दाखल केलं असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात अनेक वेळा लष्करासह राजकीय नेत्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशा दहशतवादी हल्ल्यांना लष्कराने वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.