शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 10:06 IST

दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन सरकारनं दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारताला तिसरं स्थान दिलं आहे. याबद्दलची आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी दरवर्षी अमेरिकेकडून तयार करण्यात येते. यावर्षी या यादीत इराक पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांरावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे. 2015 मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांचादेखील समावेश आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पावलेल्यांचं प्रमाण तब्बल 89 टक्क्यांनी वाढलं, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यातील 25 टक्के हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादात मोठा फरक असल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'भारतात होणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो. पाकिस्तानमधूनच या हल्ल्यांची योजना आखली जाते. पाकिस्तानच्या यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो. पाकिस्ताननं ज्या दहशतवादी संघटना पोसल्या, त्याच तिथे हल्ले घडवतात,' असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातील धोकादायक दहशतवादी संघटनांचाही यादी तयार केली आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात झालेल्या 53 टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची आकडेवारी अमेरिकेनं दिली आहे. '2016 आणि 2017 मध्ये माओवाद्यांचे हल्ले कमी झाले आहेत. मात्र हल्ल्यांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. तर जखमींच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे,' अशी आकडेवारी अहवालात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान