लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला

By Admin | Updated: May 26, 2017 23:11 IST2017-05-26T23:07:14+5:302017-05-26T23:11:44+5:30

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त असून या हल्ल्यानंतर लष्काराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला

Terrorist attack on the army's intersection | लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला

लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 26 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये  लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त असून या हल्ल्यानंतर लष्काराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्रालजवळच्या साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे अद्याप समजते. दरम्यान, या हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली आहे. 
दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून दहशवाद्यांविरुद्ध मोहीम दोन दिवसांपूर्वी थांबविण्यात आली होती. येथील हकरीपुरा भागात लष्कर-ए-तोयबाचा काश्मीर प्रमुख अबू दुजाना याच्यासह काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती. 
याचबरोबर, या मोहिमेत लष्कराच्या जवानांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यावर लोकांकडून दगडफेक करण्यात येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी इशारा दिला होता की, दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला दहशतवाद्यांचा समर्थक समजून कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही अशा घटना सुरूच आहेत.
 

Web Title: Terrorist attack on the army's intersection