लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

By Admin | Updated: June 3, 2017 14:50 IST2017-06-03T12:29:00+5:302017-06-03T14:50:54+5:30

लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत

Terrorist attack on army camp, 2 jawans martyrs | लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
"लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरुन लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला", अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. चार जवान जखमी झाले असून गंभीर जखमी झालेला दोन जवान शहीद झाले आहेत. संपुर्ण परिसरात नाकांबदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. 
 

Web Title: Terrorist attack on army camp, 2 jawans martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.