शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कितीही वैर असले तरी दुसऱ्या देशांसाठी दहशतवादाचा वापर करू नये; सौदीच्या क्राऊन प्रिंसकडून पाकला दुहेरी धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:09 IST

पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. अणुबॉम्ब बनविण्यासाठीही पाकला सौदीचाच पैसा होता, असे सांगितले जाते.

पाकिस्तानचा दौरा रद्द करून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या  सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्‍मद बिन सलमान यांनी पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. सलमान यांनी पाकिस्तानच्या दहशतवादावर जोरदार वार केला आहे. एकतर त्यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणे टाळले होते, दुसरीकडे दहशतवादावर बोलत पाकिस्तानला झटका दिला आहे. 

भारत आणि सौदीने संयुक्त निवेदन दिले आहे. यामध्ये कोणत्याही देशाने कितीही वैर असले तरी त्या देशाविरोधात दहशतवादाचा वापर करू नये असे म्हटले आहे. तज्ञांनुसार हा इशारा थेट पाकिस्तानला होता, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानला हा इशारा देणारा तोच सौदी अरेबिया आहे, ज्यांच्या सैन्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैनिक तैनात असतात. 

याच पाकिस्तानला मुस्लिम अणुबॉम्बसाठी सौदीने पैसा पुरविला होता, असे सांगितले जाते. या सौदीने या निवेदनात जगातील राष्ट्रांना इतर देशांविरुद्ध दहशतवादाचा वापर नाकारण्याचे आणि दहशतवादी कृत्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसह शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदी आणि सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीनंतर हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी आणि अतिरेकी गटांसाठी प्लॅटफॉर्म किंवा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून होऊ न देण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. दहशतवाद आणि आर्थिक पुरवठा रोखण्याच्या क्षेत्रात सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट जात, धर्म किंवा संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न उभयतांनी फेटाळला आहे. 

हा तोच सौदी का?पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. सौदीच्या प्रभावाखालील ओआयसी भागातून पाकिस्तान भारतावर वार करायचा. पाकिस्तानचे सैनिक सौदीच्या सैन्यात काम करत होते. 1998 मध्ये जेव्हा पाकिस्तानने अणुबॉम्बचे परिक्षण केलेले तेव्हा सौदीच पाकिस्तानला अण्वस्त्रे बनविण्यासाठी आर्थिक मदत करत असल्याचे जगभरातून म्हटले गेले होते. पाकिस्तानने याला मुस्लिम जगाचा बॉम्ब म्हटले होते.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद