शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र

By admin | Updated: September 18, 2016 04:51 IST

जगावरील दहशतवादाचे सावट गडद होत चालल्याचा संदेश ९/११ च्या १५व्या स्मरणदिनी जगभरातून मिळाला

जगावरील दहशतवादाचे सावट गडद होत चालल्याचा संदेश ९/११ च्या १५व्या स्मरणदिनी जगभरातून मिळाला आणि तो अमेरिकेत तर फारच स्पष्ट होता कारण अमेरिका हे इस्लामी दहशतवादाचे प्रथम लक्ष्य आहे. एकीकडे सरकार सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कठोर करत आहे तर दुसरीकडे सामान्य माणसाच्या मनात असुरक्षित असल्याची भावना बळावत आहे, असे परस्परविरोधी दुर्दैवी चित्र आज निर्माण झाले आहे.त्याच वेळी अमेरिका आणि भारत यांच्यातील विरोधाभाससुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे. दहशतवादाचे मुख्य लक्ष्य अमेरिका असून भारत, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इस्रायल हे चार देश अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत. पण अमेरिका आणि अन्य देश या धोक्याकडे जेवढ्या गंभीरपणे बघतात, तो भारतात बिलकूल दिसत नाही. या विदारक सत्याची बोचसुद्धा फार टोचून गेली.जागतिक दहशतवाद आलेखानुसार जगातील ९३ देशांना दहशतवादाने ग्रासले असून उपलब्ध अद्ययावत आकडेवारीनुसार २०१४ साली दहशतवादाने ३२६८५ बळी घेतले. यानंतरची आकडेवारी अद्याप संकलित झालेली नाही. ते काम चालू आहे. दहशतवादाचे बळी २००१ साली सुमारे ५००० होते. हे वास्तव डोळे उघडणारे आहे. जेव्हा २०१५ची आकडेवारी हाती येईल, तेव्हा या भीषण समस्येची दाहकता आणखी स्पष्ट होईल.दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका काय उपाय योजत आहे, याची माहिती मोठी उदबोधक आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ल्यात बळी पडण्याची शक्यता २०१३ साली ५६ दशलक्ष नागरिकांमागे एक अशी होती. आता ती ५ दशलक्ष नागरिकांमागे एक एवढी घटली आहे. एका सर्वेक्षणानुसार गतवर्षी ५१ टक्के अमेरिकन नागरिक दहशतवादाच्या शक्यतेने धास्तावले होते. हे सर्वेक्षण डिसेंबर २०१५ मध्ये करण्यात आले होते. परंतु तसेच सर्वेक्षण यंदा मार्च महिन्यात केले तेव्हा अशी धास्ती बाळगणारे ७२ टक्के असल्याचे आढळले.न्यूयॉर्क शहरातील जागतिक व्यापार केंद्राचे दोन गगनचुंबी मनोरे ११ सप्टेंबर २०११ साली उद्ध्वस्त करून दहशतवादाने ३००० बळी घेतले. या सर्व घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला कारण या संदर्भात अनेक निरर्गल आरोप करण्यात आले होते. या आयोगाचे दोन सदस्य, थॉमस एच कीन आणि ली एच हॅमिल्टन यांनी १० सप्टेंबर रोजी लिहिलेल्या एका लेखात हे वास्तव मान्य करून म्हटले आहे की, दहशतवादाचा हा रोग जागतिक असून मुक्त, खुल्या आणि कायद्यावर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया तो पोखरून टाकत आहे. दहशतवादाचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागेल, असे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. एक म्हणजे अल कायदा संघटनेचा नायनाट आणि दुसरी म्हणजे ही विचारधारा प्रसारित करणाऱ्या शक्तींचा वैचारिक पराभव. या दोन्ही मार्गांनी हल्ला केल्याखेरीज हा लढा यशस्वी होणार नाही, असे मत या दोघांनी व्यक्त केले आहे.अमेरिकेतील जनजीवन ९/११ नंतर बदलून गेले आहे. त्याचे प्रत्यंतर देशातील प्रत्येक विमानतळावर येत आहे. सुरक्षा तपासणी अत्यंत कडक झाल्यामुळे किमान दोन तास आधी पोहोचावे लागते, अगदी देशांतर्गत प्रवासासाठीही. आता ते सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. सर्वात कडेकोट बंदोबस्त असतोच. मात्र तो आपल्यासारखा त्रासदायक नसतो. एवढे करूनसुद्धा ओरलँडो अथवा सॅन बर्नार्डिनोसारखे दहशतवादी हल्ले अधूनमधून होतात आणि सामान्य माणूस घाबरून जातो. त्यातच फ्रान्स अथवा जर्मनीमधील इस्लामिक हल्ल्याच्या बातम्या येतात आणि या भीतीत भर पडते.दहशतवादाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा जबर तडाखा दिला आहे. उदाहरणार्थ, ९/११ नंतर अमेरिकेत अंतर्गत सुरक्षा मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्याच्यासाठी आरंभिक तरतूद होती सुमारे २० अब्ज डॉलर्स. यंदा ती ४० अब्ज डॉलर्सवर गेली आहे. तथापि सरकारच्या कारभाराचे बारीक निरीक्षण करणारे म्हणतात की, हा खर्च आता एक खर्व (ट्रिलियन) डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याच काळात संरक्षण मंत्रालयाची तरतूद ७२ टक्के वाढली आहे. याबाबतची इतर आकडेवारी अशीच छाती दडपून टाकणारी आहे.सरकारच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने पाहणारी एक जमात अमेरिकेतही आहे. ओसामा बिन लादेन याने केलेला ९/११ चा हल्ला हा एक बनाव होता, असे म्हणणारे आजही अनेक आहेत. पण त्यांच्या आरोपांचा सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांवर फारसा परिणाम होत नाही. उलट त्यांची देशभक्ती अधिक प्रखर होत जाते. आपल्याकडे असा सुदिन लवकर उजाडावा.>११ सप्टेंबर २०१६ रोजी संपूर्ण अमेरिका एकदिलाने दहशतवादाचा खातमा करण्यासाठी सज्ज झाली असल्याची सुखद जाणीव झाली. एकाही राजकीय, सामाजिक नेत्याने सरकारवर टीका केली नाही. आम्ही हा हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवू, असा निर्धार तिथल्या प्रत्येक नागरिकाने व्यक्त केला. याउलट आपल्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा आपल्या विरोधी पक्षांनी आपल्याच सरकारचा राजीनामा मागितला होता, याचे स्मरण झाले.