काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर अतिरेकी हल्ला

By Admin | Updated: March 21, 2015 02:12 IST2015-03-21T02:12:02+5:302015-03-21T02:12:02+5:30

लष्कराच्या पोषाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला.

Terror attacks on the police station in Kashmir | काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर अतिरेकी हल्ला

काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर अतिरेकी हल्ला

तीन पोलीस शहीद : संसदेत पडसाद
जम्मू : लष्कराच्या पोषाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले. पोलिसांनीही दुपारपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. राज्यात पीडीपी-भाजपा युती सरकारने सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे.

या धुमश्चक्रीत सातारा जिल्ह्यातील वाईच्या सूरज मोहिते या जवानाने प्राणांची आहुती दिली, तर एका पोलीस उपाधीक्षकासह ११ जण जखमी झाले.

Web Title: Terror attacks on the police station in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.