शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

Terror Alert On Republic Day: 'जैश-ए-मोहम्मद'ने आखला राम मंदिरावर हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांची माहिती, पोलीस अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:25 IST

Terror Alert On Republic Day: 26 जानेवारीला राजधानी दिल्ली आणि राम मंदिरासह अनेक मोठ्या शहरांवर दहशतवादी हल्ल्या करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

Terror Alert On Republic Day: येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणून 26 जानेवारीला देशाची राजधानी दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. अयोध्येतील राममंदिराला दहशतवादी लक्ष्य करू शकतात, अशी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी बॉम्बरच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे.

येत्या काही दिवसांत पाकिस्तानातील दहशतवादी संघटना राम मंदिरावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती एजन्सींना मिळाली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा कट रचला आहे. नेपाळमार्गे भारतात आत्मघाती पथक पाठवून हल्ल्याची योजना आखण्यात आली आहे. राम मंदिराच्या उभारणीचे 50 टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. या इनपुटमुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त दहशतवादी दिल्लीपासून पंजाब आणि देशातील अनेक शहरांमध्ये मोठे हल्ले करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय इस्लामिक स्टेट अल कायदाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इरबहिमच्या लोकांचीही मदत घेतल्याची माहिती आहे. 26 जानेवारीला दिल्ली आणि पंजाबमध्ये आयईडी स्फोट घडवून आणण्यासाठी पाकिस्तान आयएसआय आपल्या स्लीपर सेल आणि बेकायदेशीर रोहिंग्यांचा वापर करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. 26 जानेवारीला दहशतवादी योजना अयशस्वी झाल्यास G20 शिखर परिषदेला लक्ष्य केले जाईल, अशीही बातमी आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्लाdelhiदिल्ली