सुरत - गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. सूरतच्या पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
भीषण दुर्घटना... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुरांना चिरडले, 14 जणांचा मृत्यू
By महेश गलांडे | Updated: January 19, 2021 08:32 IST
ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
भीषण दुर्घटना... ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुरांना चिरडले, 14 जणांचा मृत्यू
ठळक मुद्देऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला.