शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाशी तणाव वाढला; भारताला किती फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:19 IST

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क :

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. भारताने आरोप लावले आहे की, कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. परंतु, कॅनडाने याचा इन्कार केला आहे. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. 

अनेक वर्षांचे संबंध...

भारत आणि कॅनडा यांच्यातील आण्विक सहकार्य दुहेरी कर, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, ऊर्जा, शिक्षण यासह इतर क्षेत्रांमध्ये करार झाले आहेत. अनेक उद्योग तसेच पर्यटन या क्षेत्रात मोठी देवाणघेवाण चालते.

भारताचे अनेक विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२ पर्यंत भारतातील १३ लाख २४ हजारांहून अधिक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. त्यापैकी १ लाख ८३ हजारांहून अधिक विद्यार्थी कॅनडामध्ये शिकत आहेत.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार ८,१६१ दशलक्ष डॉलर्सचा होता. कॅनडाने भारतात ७० अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे.

n भारताने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. n सुरक्षेच्या कारणास्तव भारतानेही गुरुवारी कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली. n या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये संबंध कसे आहेत आणि किती प्रमाणात फटका बसू शकतो याचा घेतलेला आढावा.

पर्यटन व्यवसायाला बसेल फटकाnभारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत २०२१ मध्ये एकूण ८०,४३७ पर्यटक कॅनडातून भारतात आले. हे प्रमाण एकूण विदेशी पर्यटकांच्या ५.३ टक्के इतके आहे.n२०२२-२३ मध्ये भारताने कॅनडाला सुमारे ४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. तर, कॅनडाने भारताला ४.०५ अब्ज डॉलर्सची निर्यातही केली.nभारताकडून कॅनडाला लोखंड आणि पोलाद, फार्मा उत्पादने, कपडे, अभियांत्रिकी वस्तू, मौल्यवान दगड आदींची निर्यात होते. कॅनडाकडून भारत लाकडाचा लगदा, एस्बेस्टॉस, पोटॅश, लोह भंगार, कडधान्ये, न्यूजप्रिंट, खनिजे, औद्योगिक रसायने आदी वस्तूंची आयात करतो.

 

 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाprime ministerपंतप्रधानtourismपर्यटन