शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Uttar Pradesh Assembly Election: ‘रालोआ’तील तणावाचे उत्तर प्रदेशात परिणाम; लहान मित्रपक्ष भाजपसाठी मोठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:51 IST

Uttar Pradesh Assembly Election: विकासशील इन्सान पार्टीदेखील (व्हीआयपी) भाजपशी संघर्षाच्या तयारीत दिसत असल्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे परिणाम बिहारमधील राजकारणात पडताना दिसतील.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) ताणतणाव वाढले आहेत.  भाजप आणि जनता दलात (संयुक्त) सम्राट अशोक या विषयाशिवाय दारूबंदीवरूनही ताण निर्माण झाला आहे. आता विकासशील इन्सान पार्टीदेखील (व्हीआयपी) भाजपशी संघर्षाच्या तयारीत दिसत असल्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे परिणाम बिहारमधील राजकारणात पडताना दिसतील.व्हीआयपीचे प्रमुख व बिहारचे मंत्री मुकेश सहनी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी मोठे आव्हान बनत चालले आहेत. त्यामुळे भाजप बचावात्मक पवित्र्यात आहे. भाजपकडून पुन:पुन्हा त्यांना इशारा दिला जात आहे. परंतु, मुकेश सहनी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारला पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सहनी यांनी निवडणूक लढवण्यावरून खूपच नाराजी आहे. व्हीआयपी उत्तर प्रदेशमध्ये १६५ जागा लढविणार आहे. दिला उघड इशारा...भाजपचे मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी मुकेश सहनी यांना अनेक वेळा उघड इशारा दिला आहे. निषाद यांनी बोचहा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ही जागा भाजपने २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तडजोड म्हणून त्यांना दिली होती. ही जागा जिंकलेले आमदार मुसाफिर पासवान यांचे निधन झाले आहे. परंतु, मुकेश सहनी यांचे म्हणणे असे की, ‘आमच्या सहकार्यावर सरकार  चालले आहे. मी आमच्या समाजाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी  भाजपचा खेळ बिघडवून टाकीन.’११ जिल्ह्यांतील मुस्लीम मते निर्णायक ठरणारमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ८० विरुद्ध २० वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम मतपेटीवरून निवडणुकीचे वातावरण तापले आहे. बसप, सप, काँग्रेस आणि ओवैसी यांचे पक्ष राज्यात मुस्लीम मतदारांना आपलेसे करण्यात गुंतले आहेत. राज्यात ११ जिल्हे असे आहेत की, तेथे मुस्लीम मतदार जय-पराजय ठरवितात. रामपूर, मुरादाबाद, बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, बलरामपूर, बरेली, मेरठ, बहराईच आणि फिरोजाबाद हे जिल्हे प्रमुख आहेत. या जिल्ह्यांत मुस्लीम मतदारांची संख्या ४० ते ५५ टक्के आहे. या जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यात मुस्लीम मतदार कोणत्या उमेदवाराला विजयी करू शकत नाहीत; परंतु निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात.एआयएमआयएमचे नेते ओवैसी यांनी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जारी केल्या. दुसऱ्या यादीत ८ उमेदवारांत ६ मुस्लीम आहेत. पहिल्या यादीत सर्व नऊ उमेदवार मुस्लीम आहेत. बसपची कामगिरी सुधारेल, नेत्याचा दावानवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी फक्त ३ पत्रकार परिषदा घेतल्या. उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्याआधीच बसपने शरणागती पत्करली का? बसपच्या नेत्यांचा दावा असा की, आमचे मतदार वेगळे आहेत, म्हणून इतर पक्षांसारख्या सभा व मेळाव्यांमध्ये प्रचार करण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. यावेळी बसपची कामगिरी सुधारेल. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा