शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 4:56 AM

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

नवी दिल्ली : पूर्व लडाखला लागून असलेल्या चीन व भारत यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट व हाणामारीच्या ताज्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सुरक्षा दलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत व तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत बैठक घेऊन सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.सीमेवरील चीनसोबतचा तणाव हा सन २०१७ मधील डोकलाम तणातणीनंतरचा सर्वात तीव्र तणाव आहे. त्यावेळचा तणाव पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्या भेटीनंतर तब्बल ७३ दिवसांनी निवळला होता.आताच्या तणावाच्या ताज्या घटना उत्तर सिक्कीममधील नाकू ला, पूर्व लडाखच्या सीमेवर असलेले पँनगाँग क्सो सरोवर व त्याच परिसरातील अन्य ठिकाणी झाल्या आहेत. सीमेवर गस्त घालणाऱ्या आपल्या गस्ती तुकड्यांना चिनी सैनिक अडवतात व दमदाटी करतात, असे भारताचे म्हणणे आहे. याउलट गस्त घालण्याच्या बहाण्याने भारतीय सैनिक आमच्या हद्दीत घुसखोरी करतात, असा चीनचा आरोप आहे.

टॅग्स :IndiaभारतRajnath Singhराजनाथ सिंह