जेएनयू प्रकरणावरुन श्रीनगरमध्ये तणाव
By Admin | Updated: February 19, 2016 14:50 IST2016-02-19T14:42:29+5:302016-02-19T14:50:06+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रकरणावरुन दिल्लीत गदारोळ माजला असताना त्याचे पडसाद आज श्रीनगरमध्ये उमटले. श्रीनगरमध्ये जेएनयू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले

जेएनयू प्रकरणावरुन श्रीनगरमध्ये तणाव
>ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 19 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रकरणावरुन दिल्लीत गदारोळ माजला असताना त्याचे पडसाद आज श्रीनगरमध्ये उमटले. श्रीनगरमध्ये जेएनयू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जेएनयू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या असून सुरक्षा जवानांवर दगडफेकदेखील करण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे. अफजल गुरुच्या समर्थानार्थ कार्यक्रम घेतल्याने जेएनयू विद्यार्थ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर यावेळी झळकावण्यात आले. अफजल गुरुला समर्थन करणा-या आंदोलकांनी यावेळी पाकिस्तान आणि आयसीसचा झेंडादेखील फडकावला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा जवानांनी बळाचा वापर करत लाठीचार्जदेखील केला आहे.