शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:52 IST

भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

ठळक मुद्देचीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नवी दिल्ली- चीनची सेना लडाखमधील पँगॉग त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी)वर वेगाने आपल्या सैन्याचा विस्तार करीत आहे. त्यामुळे भारताबरोबर असलेला सीमावादाचा संघर्ष चीन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन आठवड्यांत विशेषत: गॅल्व्हन व्हॅलीमध्ये चिनी सैन्यानं सुमारे 100 तंबू उभारले आहेत. चिनी सैन्य तिथे बंकर बनवण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीननं अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघर्षादरम्यान चीननं भारताच्या जवानांना ताब्यात घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु भारतीय लष्करानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेह येथील 14 वाहिनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि एलएसीवरील वादग्रस्त जागेसह संपूर्ण परिसराच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्य सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्य त्सो लेकजवळ आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या दोन्ही ठिकाणी चिनी सैन्याशी सामना करण्यासाठी सैन्य पाठवत आहे. इतर अनेक संवेदनशील भागात भारत चीनपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे. 5 मे रोजी पूर्वेकडील लडाखमधील परिस्थिती आणखी चिघळली होती, जेव्हा सुमारे 250 चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात हिंसक चकमक झाली होती.दुसर्‍या दिवसापर्यंत तो संघर्ष सुरूच होता. नंतर दोन्ही बाजूच्या लोकल कमांडरची बैठक झाली आणि दोन्ही बाजूचे सैनिक माघारी फिरले. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली होती. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे सुमारे 100 सैनिक जखमी झाले. 9 मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. नाकू ला पास येथे जवळपास 150 भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे किमान दहा सैनिक जखमी झाले.गेल्या आठवड्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेचे अनेक वेळा उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही किंवा याची पुष्टीही झालेली नाही. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या स्थानिक कमांडरमध्ये किमान पाच बैठका झाल्या. या बैठकीत भारतीय कमांडरने गॅल्व्हान व्हॅलीमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने मोठ्या प्रमाणात तंबू उभारल्याबद्दल आक्षेप घेतला. पीएलए ज्या भागात तंबू उभारत आहे, तो भाग भारताच्या हद्दीतील आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत