- बलवंत तक्षकचंदीगड : जाट समुदायाचे दोन मेळावे आणि भाजपा खासदाराची जाटांना आरक्षण देण्याच्या विरोधातील रविवारी, २६ रोजी होणारी सभा यांमुळे राज्याच्या विविध भागांत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, हरयाणा सरकारने १३ जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद केली आहे.जाट आरक्षणाला विरोध करणारे भाजपाचे संसद सदस्य राजकुमार सैनी यांनी जींदमध्ये ‘समानता महासंमेलना’ची घोषणा केली आहे, तर आॅल इंडिया जाट आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशपाल मलिक यांनी याच दिवशी रोहतक जिल्ह्याच्या जस्सियामध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे.सरकारच्या वतीने शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जींद, हांसी, भिवानी, हिसार, फतेहाबाद, करनाल, पानीपत, कैथल, रोहतक, सोनीपत, झज्जर आणि चरखी दादरी जिल्ह्यात व्हॉइस कॉल वगळता मोबाइल इंटरनेट सेवा २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहे.यात म्हटले आहे की, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा आदेश देण्यात आलेला आहे.संमेलनाला विरोधसैनी यांच्या रॅलीला विरोध म्हणून शुक्रवारी जाट समुदायाने जींद-चंदीगढ हा राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत येथील आंदोलकांना पांगविले आणि वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला. जाट समुदायाचे एक नेते संदीप भारती यांनी सैनी यांची रॅली रद्द करण्याची मागणी केली आहे.
हरयाणातील इंटरनेट सेवा बंद, जाट व भाजपा खासदारांच्या मेळाव्यामुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:45 IST