शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मथुरेत तणावपूर्ण वातावरण; जाणून घ्या काय आहे ईदगाह आणि मंदिराचे संपूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:03 IST

गेल्या महिन्यात अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी 6 डिसेंबर रोजी शाही मशिदीत भगवान कृष्णाची मूर्ती बसवून जलाभिषेक करणार असल्याची घोषणा केली होती.

मथुरा:मथुरा शहरात सध्या कलम 144 लागू आहे. शहरातील सर्व गेट, मुख्य मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात प्रवेश करताना लोकांची तपासणी केली जात आहे. संशयितांकडून ओळखपत्रे मागविण्यात येत आहेत. शहरात हजारो पोलिस तैनात आहेत. यामागे कारण आहे ईदगाह-मंदिर आणि जलाभिषेक. जाणून घ्या काय आहे नेमकं हे प्रकरण ?

का चर्चेत आहे मथुरा ?

गेल्या महिन्यात अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी 6 डिसेंबर रोजी शाही मशिदीत भगवान कृष्णाची मूर्ती बसवून जलाभिषेक करणार असल्याची घोषणा केली होती. या संस्थेचा दावा आहे की, भगवान कृष्णाचे खरे जन्मस्थान मशिदीच्या आत आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या या घोषणेला श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास, नारायणी सेना आणि श्रीकृष्ण मुक्ती दलानेही पाठिंबा दिला होता. यानंतर शहरात तणाव वाढू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आले.

केशव मौर्य यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली

हिंदू संघटनांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या दिशेने निघालेल्या उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी 1 डिसेंबर रोजी विधान केल्यावर ही बाब चर्चेत आली. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, अयोध्या काशीच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे, मथुरेची तयारी सुरू आहे. त्यांचे ट्विट आजही त्याच्या ट्विटर टाइमलाइनवर पाहिले जाऊ शकते. या ट्विटनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.

काय आहे मंदिर-मशीद वाद?

मुघल शासक औरंगजेबाने 1669 मध्ये श्रीकृष्ण मंदिर पाडून त्याच्या एका भागात ईदगाह बांधल्याचा दावा हिंदू संघटना करतात. हे ईदगाह हटवण्यासाठी हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. हिंदू बाजूंचा दावा आहे की, जिथे कंसाचे तुरुंग होते, तिथेच भगवान कृष्णाचा जन्म झाला. 1669 मध्ये मुघल शासक औरंगजेबाने या तुरुंगाची नासधूस करुन शाही ईदगाह बांधली होती. 

ईदगाहचा झालेला करार चुकीचामागील अनेक वर्षांपासून हिंदू महासभा या ठिकाणाहून ईदगाह हटवण्याची मागणी करत आहे. सध्या हे प्रकरण मथुरा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. अहवालानुसार, कृष्ण जन्मभूमीची 13.33 एकर जमीन अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी राजा माल यांच्याकडून खरेदी केली होती. हिंदू संघटनेने मथुरा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यात 2 ऑक्टोबर 1968 रोजी झालेला करार चुकीचा आहे. हा करार रद्द करून मंदिर परिसरात असलेली ईदगाह हटवून ती जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी या संघटनेने न्यायालयाकडे केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmathura-pcमथुरा