गतीमंद मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला दहा वर्ष सक्तमजुरी
By Admin | Updated: December 1, 2015 23:36 IST2015-12-01T23:36:23+5:302015-12-01T23:36:23+5:30
जळगाव: गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनु उर्फ बाबु लक्ष्मण पाटील (वय १९ रा.राजदेहरे ता.चाळीसगाव) या तरुणाला मंगळवारी न्यायालयाने लैंगिक गुन्ापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार दंड तर कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.

गतीमंद मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला दहा वर्ष सक्तमजुरी
ज गाव: गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनु उर्फ बाबु लक्ष्मण पाटील (वय १९ रा.राजदेहरे ता.चाळीसगाव) या तरुणाला मंगळवारी न्यायालयाने लैंगिक गुन्ापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार दंड तर कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.राजदेहरे परिसरात मजुरीसाठी एक महिला व तिची मुलगी बाहेरगावावरुन आली होती. ही महिला कामावर गेली असता मनु पाटील हा तिच्या झोपडीत येवून गतीमंद मुलीवर अत्याचार करुन निघून जात होता. त्याने अनेक वेळा तिच्याशी शारीरीक संबंध केले. मजुरीचे काम आटोपल्यानंतर ती महिला पिडीत मुलीला घेवून गावाकडे गेली. तिकडे गेल्यावर पिडीत मुलगी आजारी पडल्यावर तिला डॉक्टरांकडे घेवून गेले असता पोटात गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आईने विश्वासात घेवून विचारणा केल्यावर तिने घडलेली हकीकत सांगितली. त्यानुसार २८ मार्च २०१४ रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मनुविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ाच्या तपासा दरम्यान पिडीत मुलीने एका बाळाला जन्म दिला. इन्फो...रक्ताच्या नमुन्यात बाप सिध्दया तपासात नवजात बाळ, पिडीत मुलगी व आरोपी मनु या तिघांचे रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्या अहवालात मनु हाच त्या नवजात बाळाचा बाप असल्याचे सिध्द झाले. या खटल्यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासाधिकारी पोर्णिमा राखुंडे व डॉ.उमेश पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.