दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार संशयित फरार : पीडित मुलीचा इनकॅमेरा नोंदविला जबाब

By Admin | Updated: July 18, 2016 00:58 IST2016-07-18T00:58:03+5:302016-07-18T00:58:03+5:30

जळगाव: औद्योगिक वसाहत परिसरातील एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ten years old girl abducted, tortured: The victim's InCamera reported the responsibility | दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार संशयित फरार : पीडित मुलीचा इनकॅमेरा नोंदविला जबाब

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार संशयित फरार : पीडित मुलीचा इनकॅमेरा नोंदविला जबाब

गाव: औद्योगिक वसाहत परिसरातील एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीचे वडील हे कुटुंबाला सोडून निघून गेले आहेत तर आईचे निधन झाले आहे. ती आजी व मामाकडे वास्तव्याला आहे. निकम हा भाड्याने रिक्षा चालवतो. तो पीडित मुलीच्या घरासमोरच पत्नी व मुलींसह राहतो. दारुचे व्यसन असल्याने तो रात्री पीडित मुलीच्या घरात घुसला व तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने सकाळी आजी व मामाला सांगितला. महिला उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांनी पीडित मुलीचा इनकॅमेरा जबाब नोंदविला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी स्वत:कडेच हा तपास घेतला. त्याच्या शोधार्थ वेगवेगळे पथके पाठविण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी सुनील कुराडे यांनी दिली.

Web Title: Ten years old girl abducted, tortured: The victim's InCamera reported the responsibility