दहा वर्षीय बालकासह तिघांना पळवून नेले
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
युवतीचाही समावेश : अपहरणाचा गुन्हा दाखल
दहा वर्षीय बालकासह तिघांना पळवून नेले
युवतीचाही समावेश : अपहरणाचा गुन्हा दाखलनागपूर : एमआयडीसीतील एका १० वर्षाच्या बालकासह तिघांना पळवून नेल्याच्या घटना उपराजधानीत घडल्या. तीनही मुले अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एमआयडीसीतील अमरनगरात राहाणारे चंद्रशेखर देवाजी बनकर (वय ३२) यांचा मुलगा साहिल (वय १०) शनिवारी रात्री ७ पासून बेपत्ता आहे. त्याला कुणी तरी पळवून नेले असावे, असा संशय बनकर यांनी तक्रारीत नमूद केला. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अंबाझरीतील तेलंगखेडीत राहणाऱ्या शिल्पी अजय बागडी (वय ३७) यांच्याकडे रोहित शर्मा (वय १७) हा घरकाम करायचा. आरोपी संजय मंगलचंद बागडी (वय ४०) आणि राकेश राऊत (वय ४०, रा़ वाडी) यांनी शनिवारी पहाटे मारहाण करून त्याचे अपहरण केले. आरोपींनी त्याला चंद्रपुरात नेल्याची माहिती आहे. शिल्पी बागडी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा आणि रोहित शर्माचा शोध घेतला जात आहे. आरोपी संजय आणि फिर्यादी शिल्पी बागडी हे नातेवाईक असून, घरगुती वादातून ही घटना घडल्याचे अंबाझरी पोलीस सांगतात. गिट्टीखदानमधील एका १७ वर्षीय मुलीला आरोपी धीरज भगत (रा़ भिवसनखोरी) याने रविवारी दुपारी पळवून नेले. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी तसेच पीडित मुलीचा शोध घेतला जात आहे. ---