दोन लाख स्क्रीनद्वारे रेल्वे कमावणार दहा हजार कोटी

By Admin | Updated: April 25, 2017 00:35 IST2017-04-25T00:35:56+5:302017-04-25T00:35:56+5:30

देशभरातील रेल्वे स्टेशनांवर दोन लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून दहा वर्षांसाठी दहा हजार कोटी उत्पन्न

Ten thousand crores of earning railways through two lakh screens | दोन लाख स्क्रीनद्वारे रेल्वे कमावणार दहा हजार कोटी

दोन लाख स्क्रीनद्वारे रेल्वे कमावणार दहा हजार कोटी

नवी दिल्ली : देशभरातील रेल्वे स्टेशनांवर दोन लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून दहा वर्षांसाठी दहा हजार कोटी उत्पन्न मिळवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनांना लवकरच डिजिटल स्क्रीन प्राप्त होणार आहे.
या माध्यमातून प्रवाशाला ट्रेनची वास्तविक वेळ आणि राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसंदर्भात जाहिरातींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (फऊठ)कडे यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टचा गुगल हिस्सा होण्यासाठी उत्सुक आहे. तसेच गुगलनं यासाठी जाहिराती तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे. मायकोसॉफ्ट आणि रिलायन्सलाही या प्रोजेक्टचा भाग होण्याची आकांक्षा असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजलं आहे. यामुळे दूरदर्शनपेक्षाही सर्वात मोठा जाहिरात मंच निर्माण होण्याचे अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Ten thousand crores of earning railways through two lakh screens