मिथिला वासनकरला तात्पुरते संरक्षण
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
हायकोर्ट : अटकपूर्व जामीन अर्जावर नोटीस

मिथिला वासनकरला तात्पुरते संरक्षण
ह यकोर्ट : अटकपूर्व जामीन अर्जावर नोटीसनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीची संचालक मिथिला वासनकरला अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये पुढील तारखेपर्यंत तात्पुरते संरक्षण प्रदान केले आहे. सत्र न्यायालयाने अलीकडेच तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी शुक्रवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला नोटीस बजावून ६ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, तेव्हापर्यंत मिथिलाला तात्पुरते संरक्षण प्रदान केले. अंबाझरी पोलिसांनी मिथिलाविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ५०६, १२०-बी व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सत्र न्यायालयाने ६ महिने अंतरिम संरक्षण कायम ठेवल्यानंतर तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अकोला येथील प्रकरणात तिचा अन्य अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रशांत जयदेव वासनकर हा कंपनीचा सर्वेसर्वा असून मिथिला ही प्रशांतचा भाऊ विनयची पत्नी होय.