पुलाचा कठडा तोडून टेम्पो मुळा नदीत
By Admin | Updated: April 25, 2016 07:24 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T07:24:59+5:30
पुणे : मुळा नदीवरील हॅरीस पुलाचा कठडा तोडून विनायक साऊंड सर्व्हिसेसचा भरधाव टेम्पो नदीमध्ये कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. नदीमध्ये अडकलेल्या आठही जणांचे जीव वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुलाचा कठडा तोडून टेम्पो मुळा नदीत
पुणे : मुळा नदीवरील हॅरीस पुलाचा कठडा तोडून विनायक साऊंड सर्व्हिसेसचा भरधाव टेम्पो नदीमध्ये कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. नदीमध्ये अडकलेल्या आठही जणांचे जीव वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अजय कलसे (२५), विशाल मलाळे (१६), टेम्पोचालक शब्बीर (२७), सलमान शेख (१९), भावड्या बोर्हाडे (१५), तुषार (१६), सिद्धेश (१४) यांच्यासह एकूण आठ जण जखमी झाले आहेत. विनायक साऊंड सर्व्हिसेसच्या मालकाकडे हे सर्व जण नोकरी करतात. शनिवारी दापोडीमधील मिरवणूक संपल्यानंतर स्पीकर साहित्य टेम्पोतून पिंपरीकडे नेण्यात येत होते. हॅरिस पुलावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
---