शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:14 IST

दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत. 

बलवंत तक्षक -

चंडीगड : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार व अभिनेत्री कंगना रणौत ज्या ज्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या, त्या मंदिरांची स्वच्छता करणे आवश्यक आहे, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी केले आहे. दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत. 

कंगना दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत...हिमाचल प्रदेशमध्ये देव समाजाची संस्कृती महत्त्वाची असून, तिच्या विरोधात काही गोष्टी सुरू आहेत. या समाजाला बदनाम करण्याचेही प्रयत्न होत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांचा निवडणुकीत पराभव होणार हे निश्चित आहे. सिंह यांनी सांगितले की, रणौत या दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत. त्यांचे एक पाऊल मुंबईत, तर दुसरे पाऊल हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागणार आहे. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांनंतर कंगना रणौत यांच्या हाती पुन्हा मुंबईला परत जाऊन फक्त चित्रपटात काम करणे इतकेच उरणार आहे.

काँग्रेसने केली निदर्शनेभाजप उमेदवार कंगणा रणौत यांना सोमवारी लाहौल व स्पिती येथे काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. या प्रकाराची हिमाचल प्रदेश भाजपने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी व दोषी निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली. ‘कंगना रणौत परत जा,’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. रणौत यांनी दलाई लामा यांच्याबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले होते. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४