मुस्लिम सरपंचाने बांधले मंदिर
By Admin | Updated: March 9, 2015 23:45 IST2015-03-09T23:45:32+5:302015-03-09T23:45:32+5:30
सामाजिक ऐक्याचे प्रत्यक्ष उदाहरण मुस्लिम सरपंचाने स्वखर्चाने सहार गावात मंदिर बांधून समोर ठेवले आहे. महादेव आणि हनुमानाच्या

मुस्लिम सरपंचाने बांधले मंदिर
मथुरा : सामाजिक ऐक्याचे प्रत्यक्ष उदाहरण मुस्लिम सरपंचाने स्वखर्चाने सहार गावात मंदिर बांधून समोर ठेवले आहे. महादेव आणि हनुमानाच्या या मंदिराचे बांधकाम सहार (जि. मथुरा) गावात जवळपास आठ महिन्यांपूर्वी सरपंच अजमल अली शेख यांनी सुरू केले होते. रविवारी वैदिक मंत्रोच्चारात धार्मिक अनुष्ठानासह मंदिरात महादेव व हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लवकरच मंदिर परिसरात पुजारी आणि भाविकांच्या राहण्यासाठी काही खोल्या बांधल्या जातील. मंदिर उभारण्यासाठी मला स्वत:ला चार लाख रुपये खर्च आल्याचे अजमल अली शेख यांनी सांगितले. शेख म्हणाले की, अनेक वर्षांपासून मला सहार गावात मंदिर नसल्याची रुखरुख वाटत होती. (वृत्तसंस्था)