शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

आता तुमचं घर होणार कमी गारेगार; सरकार वाढवणार एसीचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 13:39 IST

गरमीपासून सुटका करण्यासाठी एसी घ्यायचा विचार करत असाल तर नवा एसी हा 16 नाही तर आता 24 डिग्रीवर चालणार आहे. 

ठळक मुद्देनवीन एसी खरेदी केला तर तो 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार.ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (BEE) सरकारसोबत मिळून एनर्जी परफॉर्मंस स्टँडर्ड निश्चित केले.नवा नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आला.

नवी दिल्ली - उन्हाळ्यामध्ये जेव्हा पारा 40च्या आसपास पोहोचतो. त्यावेळी अंगाची अगदी लाहीलाही होते. पंखा किंवा कूलरही काही करू शकत नाही. अशातच एयर कंडिशनर म्हणजेच एसी हा एकमेव उपाय असतो. दिवसभर अनेक जण सेंट्रलाइज्ड एसी असलेल्या ऑफिसमध्ये असतात आणि रात्रीसुद्धा एसीमध्येच झोपतात. हैराण करणाऱ्या उकाड्यापासून शांतता देणारा एसी हवाहवासा वाटत असतो. मात्र आता गरमीपासून सुटका करण्यासाठी एसी घ्यायचा विचार करत असाल तर नवा एसी हा 16 नाही तर आता 24 डिग्रीवर चालणार आहे. 

नवीन एसी खरेदी केला तर तो 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 डिग्री सेट करण्यात येणार आहे. हे तापमान कमी जास्त करता येऊ शकतं. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ऊर्जा बचतीसाठी नियम बनवणारी संस्था, ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (BEE) सरकारसोबत मिळून एनर्जी परफॉर्मंस स्टँडर्ड निश्चित केले आहेत. 

ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नववर्षात नवीन सेटिंगसह एसी तयार केले जाणार आहेत. नवा नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आला आहे. ऊर्जा बचतीसाठी सरकारने हा नवा नियम आणल्याची माहिती मिळत आहे. BEE कडून स्टार रेटिंग मिळवणाऱ्या सर्व रूम एसीसाठी 24 डिग्री ही डिफॉल्ट सेटिंग अनिवार्य करण्यात आली आहे. एसीचे तापमान हे कमी-जास्त करता येऊ शकते. यामध्ये एक ते पाच स्टार असलेल्या विंडोसोबतच स्प्लिट एसीचाही समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

2006 मध्ये बीईईने एसीसाठी स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केलं होतं. 12 जानेवारी 2009 मध्ये तो अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 2015 मध्ये एसी इनव्हर्टरसाठी स्टार लेबल सुरू करण्यात आले. त्यानंतर 1 जानेवारी  2018 रोजी लागू झाला. तसेच 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 4.6 अब्ज युनिट ऊर्जेची बचत केली. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या रिपोर्टनुसार, 2050 पर्यंत जगभरात एसीची सर्वाधिक मागणी भारतात असणार आहे. एसी 24 ते 25 डिग्री तापमानात सुरू असेल तर विजेच्या बिलातही बचत होऊ शकते. 

महत्त्वाच्या बातम्या 

भारताचं गगनयान अवकाशात जाणार; पाहा अंतराळवीर सोबत काय काय नेणार?

नरेंद्र मोदी भारताचे 'हिंदू जिना', तरुण गोगोईंचा हल्लाबोल

JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 'फोन पे चर्चा', म्हणाले...

 

टॅग्स :electricityवीजTemperatureतापमान