शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणते चिन्ह हवे बोला! झेंडा आहे, टोप्याही आहेत आणि रुमालदेखील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 12:12 IST

राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे. 

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांनी प्रचार प्रारंभ केला आहे. पुढील दाेन महिने देशभरात निवडणुकीचा ज्वर चढलेला दिसणार आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या काळात मागणी वाढलेली असते. त्यात आता ई-कॉमर्स कंपन्यांनीही उडी घेतली आहे. राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे. 

या वस्तूंची जाेरदार विक्रीई-कॉमर्स वेबसाइट्सवरून विक्री होणाऱ्या वस्तूंत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ, आपचे चिन्ह झाडू, काँग्रेसचे चिन्ह पंजा आणि राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ इत्यादींचा समावेश आहे. सर्व पक्षांचे रुमाल, दुपट्टे, पेंडंट, टी शर्ट, चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू आहे.समाजवादी पार्टीचा लाेगाे असलेल्या की-चेन, तृणमूलचे चिन्ह असलेले नाइट लॅम्प, माकपाचे वाहनांवर लावता येणारे झेंडे, इत्यादी साहित्यांचीही विक्री हाेत आहे.

अशी झाली सुरुवात२०१९ च्या निवडणुकीत हा कल सुरू झाला. सर्वच साहित्य ऑनलाइन विकले जात असेल तर निवडणूक साहित्य का नको, असा प्रश्न निर्माण झाला. विक्रेत्यांनीच पुढाकार घेऊन या वस्तू आमच्या मंचवर टाकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

पक्षांची स्वत:च्याच वेबसाइटवरून साहित्याची विक्रीकाही राजकीय पक्षांनी आपल्याच वेबसाइट्सवर आपल्या साहित्याची विक्री सुरू केली आहे. उदा. नमो मर्चंडाइज वेबसाइटवर नरेंद्र मोदींशी संबंधित अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. आता ऑनलाइन विक्री होत असल्यामुळे तिकडेही पुरवठा वाढला आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून वाढत मागणी आहे. निवडणूक रॅलीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात.

७०% विक्रीत वाढ गेल्या लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत.४०%एकूण विक्रीतील वाटा हा निवडणुकीशी संबंधित साहित्यांचा आहे.३०० काेटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल निवडणुकीच्या काळात हाेण्याचा अंदाज आहे.६०० पेक्षा जास्त साहित्यांची विक्री दरराेज एका पुरवठादाराकडे हाेत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४