शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

KCR यांना मोठा झटका! माजी मंत्री, खासदार आणि आमदारांसह BRS मधील ३५ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 19:54 IST

गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, पण आता बीआरएस पक्षालाच मोठा झटका बसला आहे.  तेलंगणातील अनेक बीआरएस नेत्यांनी सोमवारी केसीआर यांना रामराम केला, आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

PM मोदींचा मध्य प्रदेश दौरा अचानक रद्द; मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितलं कारण

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस जोरदार तयारी करत आहे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तेलंगणातील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलाच्या या सोहळ्यामुळे सीएम केसीआर यांच्या पक्ष बीआरएसला मोठा झटका बसला आहे. तेलंगणामध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणूक वर्षात अनेक BRS नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, बीआरएसच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे.

सोमवारी माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाशी हातमिळवणी केली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगण प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. तेलंगणातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी २ जुलै रोजी तेलंगणाचा दौरा करणार असल्याचे समोर आले आहे.

माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह किमान ३५ बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत या नेत्यांनी सोमवारी येथे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे, जिथे हे सर्व नेते औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे गेल्या लोकसभा निवडणुकीत खम्मममधून बीआरएसचे खासदार होते.

भारत जोडो यात्रेने आणला बदल : पवनखेडा 

पवनखेडा म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर परिवर्तनाचे वादळ आले आहे. याचा परिणाम आपण कर्नाटकात पाहिला आहे. पक्ष काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी तेलंगणाला दिला. आज अनेक बड्या नेत्यांनी खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. 'देशभर परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, त्याचा परिणाम कर्नाटकात दिसला आणि इतर राज्यांमध्ये बदलाचे वारे दिसले. आता बीआरएसचे महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाcongressकाँग्रेस