शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आधार ई-केवायसी वापर बंद करा; सरकारचे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 09:48 IST

मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सरकारने शुक्रवारी हे निर्देश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टानं गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ईKYCचा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्यास सांगितले आहे. शिवाय, यासंबंधीचा अहवाल 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे. 

दूरसंचार विभागानं आपल्या 3 पानांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसहीत त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केव्हायसीचा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, जर नवीन कनेक्शनसाठी ग्राहक स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत पुरवत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण याचा ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो. शिवाय, सर्व टेलिकॉम कंपन्या वेळबद्ध पद्धतीनं या आदेशाचे पालन सुनिश्चित करतील, असेही यात सांगण्यात आले आहे. 

दूरसंचार विभागाच्या अनुसार,  मोबाइल ग्राहकांना पर्यायी डिजिटल प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये कस्टमर एक्विझिशन फॉर्मसहीत ग्राहकांना फोटोसोबत ओळख आणि पत्त्यासाठी स्कॅन कॉपीचा उपयोग करता येईल. या पार्श्वभूमीवर नवीन ग्राहकांसाठी सर्व डिजिटल प्रक्रिया असतील.  

टॅग्स :MobileमोबाइलAdhar Cardआधार कार्डGovernmentसरकार