शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचे रिचार्ज 'इतके' महागणार?; कंपन्या नुकसान भरून काढण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 14:13 IST

मोबाईल कंपन्या लवकरच दरवाढ करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी मोबाईल धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे रिचार्ज लवकरच महागण्याची शक्यता आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे कंपन्यांपुढील समस्या अचानक वाढल्या. त्यामुळे आता पुढील १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत दोनवेळा मोबाईल प्लान्स महाग होऊ शकतात. या वाढीनंतर रिचार्जचे दर आताच्या तुलनेत दुप्पट होतील. 'नवभारत टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.सध्याच्या घडीला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या रिचार्जचे दर वाढवण्याच्या विचारात आहेत. याची तातडीनं अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आता लगेच रिचार्जचे दर न वाढल्यास ते पुढील काही दिवसांत वाढवले जातील, अशी माहिती इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया एँड एंटरटेनमेंट एँड टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या प्रशांत सिंघल यांनी दिली. 'रिचार्जचे दर वाढवण्याची गरज आहे. पुढील ६ महिन्यांत दरांमध्ये वाढ आवश्यक आहे. ही दरवाढ जितकी लवकर होईल, तितकं कंपन्यांसाठी चांगलं असेल,' असं सिंघल म्हणाले.सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना परवडणारे रिचार्ज देणं गरजेचं आहे. ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मोबाईल प्लानचे दर वाढवणं फारशी चांगली कल्पना वाटत नाही, असं सिंघल यांनी सांगितलं. पुढील १२ ते १८ महिन्यांत दोनवेळा मोबाईल प्लान महाग होऊ शकतात. पुढील सहा महिन्यांत कंपन्या पहिली दरवाढ करतील. बाजारात स्थिर राहण्यासाठी कंपन्यांना हे पाऊल उचलावं लागेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. मात्र अद्याप यावर कंपन्यांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफ प्लान्सचे दर वाढवले होते. भारतीय बाजाराचा आकार पाहता कंपन्यांकडे असणाऱ्या ग्राहकांची संख्या अतिशय मोठी आहे. मात्र प्रति ग्राहकाकडून अपेक्षित असलेला महसूल कमी आहे. त्यामुळे ग्राहक जास्त असूनही अनेक कंपन्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफचे दर ४० टक्क्यांनी वाढवले. आता दोन टप्प्यांमध्ये कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे.अन्य महत्त्वाच्या बातम्यामोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारीचीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?

टॅग्स :Mobileमोबाइल