शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:45 IST

Telangana BJP: केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दक्षिणेचे गेट म्हटल्या जाणाऱ्या तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका (Telangana Election) होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपही निवडणुकीच्या रंगात रंगले आहेत. मात्र, यावेळी सर्वांच्या नजरा भाजपकडे लागल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राज्यातील 119 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. मे महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा दौरा करून पक्षाच्या संघटनेत उत्साह भरला आहे. आता हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन करून पक्षाने आपला इरादा स्पष्ट केला आहे.

तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. लक्ष्मण म्हणाले की, महाराष्ट्रात डायनेस्टिक पॉलिटिक्सविरोधात आवाज उठवला गेला आहे. तेलंगणा हा त्याचाच पुढचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विकास आणि घराणेशाही नष्ट करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल आणि तेलंगणात सरकार स्थापन करेल. तर भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे (एनईसी) सदस्य 30 जूनपासून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.

केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. हैदराबादमध्ये 2 जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी सर्वजण दोन दिवस किंवा 48 तास वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात घालवतील. राष्ट्रीय कार्यकारिणीचे हे सदस्य सर्व राजकारणाशी संबंधित माहिती गोळा करतील, ज्याच्या आधारे पक्ष राज्यात आपली रणनीती तयार करेल.

हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार!हैदराबाद येथे होणाऱ्या दोन दिवसीय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक संपल्यानंतर मोदी हैदराबादच्या परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करतील.

भाजपचे मिशन तेलंगणा! एकूणच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (National Executive Meeting) बैठकीतून निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र राव यांनी सांगितले की, शेवटच्या दिवशी म्हणजेच 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेसाठी राज्यभरातून दहा लाख लोकांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये डिसेंबर 2023 मध्ये (Telangana Election 2023) विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, टीआरएस प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर गेल्यावेळेप्रमाणे पहिली निवडणूक घेऊ शकतात, असा विरोधकांचा विश्वास आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी यावेळी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या आयपीएसीकडे सोपवली आहे.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाह