शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 04:15 IST

केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.

- धनाजी कांबळेतेलंगणा राज्याच्या निर्मितीचा मुद्दा भावनिक होता. टीडीपी काँग्रेससोबत गेल्याने येथील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मते वळविण्यात केसीआर यशस्वी ठरले आहेत. विरोधकांनी पातळी सोडून टीका-टिप्पणी केल्याने त्याचा काँग्रेस आघाडीला नुकसानच झाल्याचे दिसत आहे.शेतकरी कर्जमाफी, दलित-आदिवासींना ३ एकर जमीन, रोजगार, मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, दोन खोल्यांची घरे, पेन्शन असे प्रश्न प्रामुख्याने विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले; केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.भाजपाने मात्र हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून मुस्लिमांचे लाड करून घेतले जाणार नाहीत, तसेच १२ टक्के आरक्षण देणे शक्यच नाही, कोणी देण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी भडकावू भाषणे केली.नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहन केले; मात्र तेलंगणात केवळ २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच येथे आल्या होत्या. त्यांच्या सभेचा परिणाम होईल, असे वाटले होते. मात्र, स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक झाल्याने काँग्रेसला देखील टीडीपीला सोबत घेऊनही मतदारांनी नाकारले आहे. टीडीपीचा तेलंगणातील वाढता हस्तक्षेप धोकादायक असून, आंध्रातील लोक आमच्यावर राज्य करतील, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन केसीआर यांनी सभांमधून केले आहे. त्यामुळे अस्मितेचा मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे.एमआयएमने ८ जागा लढविल्या. त्यात त्यांना आता ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सुरुवातीलाच टीआरएसला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे हैैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार विजयी होतील, असेच अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त झाले होते.या कारणांमुळे झाला टीआरएसचा विजयतेलंगणाच्या जनतेवर आंध्रातील लोक राज्य करतील, हा भावनिक मुद्दाचित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.काँग्रेसने टीडीपीला सोबत घेतल्याने काँग्रेसबद्दलची सहानुभूती कमी होऊन टीआरएसकडे कल वाढला.विकासकामे आणि राबविलेल्या योजनांमुळे लोकमत आपल्या बाजूला वळविण्यात केसीआर यांना यश आले. विरोधकांमधील बेकीमुळेही टीआरएसला मदत झाली.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस