शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एवढंसं कारण...! मंत्र्यानं सर्वांसमोर बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 21:34 IST

या व्हिडिओमध्ये तेलंगणाचे गृहमंत्री संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याला बुके मागतात दिसत आहेत. मात्र, त्या क्षणी पीएसओकडे बुके नसतो, म्हणून ते त्याच्या कानाखाली थापड मारतात.

तेलंगणाचे गृह मंत्री मेहमूद अली यांनी, शुक्रवारी मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, लवकर बुके मिळाला नाही, म्हणून कथितपणे आपल्याच एका सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली थापड मारल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त व्हायरल हेत आहे. या व्हडिओमध्ये मेहमूद अली वाढदिवसाच्या कार्याक्रमात सहकारी मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, मेहमूद अली याच्याकडे तेलंगणा सरकारमध्ये जेल आणि अग्निशमन सेवेचा अतिरिक्त प्रभारही आहे.

बुके लवकर मिळाला नाही म्हणून...  -या व्हिडिओमध्ये तेलंगणाचे गृहमंत्री संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याला बुके मागतात दिसत आहेत. मात्र, त्या क्षणी पीएसओकडे बुके नसतो, म्हणून ते त्याच्या कानाखाली थापड मारतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात घढली. ही घटना घढली, तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी, काही सरकारी अधिकारी आणि बीआरएसचे नेतेही तेथे उपस्थित होते. या घटनेनंतर, भाजपने मंत्र्यांच्या या कृत्यावरून बीआरएस सरकारवर टीका करत, सार्वजनिक माफी मागण्याचीही मागणी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपचे वरिष्ठ नेते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे, “ही पूर्णपणे लज्जास्पद आणि धक्कादायक घटना आहे. तेलंगणाच्या गृहमंत्र्याने आपल्या सुरक्षारक्षकाला बुके द्यायला उशीर केला, म्हणून सार्वजनिक ठिकाणी थापड मारली. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. या घटनेवरून बीआरएसच्या व्हीव्हीआयपी अहंकाराची मानसिकता दिसून येत." एवढेच नाही, तर त्यांनी आज एका सुरक्षारक्षकाला  थपड मारली. त्यांना पदावरून काढून टाकले जाणार का? त्यांना तेलंगणाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला लावली जाणार का? की व्होट बँकेच्या नावाखाली त्यांना पदावरच कायम ठेवले जाणार? असे सवालही यावेळी पुणावाला यांनी केले आहेत. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीPoliceपोलिस